५ कोटींची लाच देणाऱ्या आमदारास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: June 2, 2015 00:47 IST2015-06-02T00:47:14+5:302015-06-02T00:47:14+5:30

तेलंगणा विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या बाजूने मतदान करवून घेण्यासाठी एका नामनिर्देशित आमदारास लाच देताना रंगेहात अटक झालेले तेलगू

14-day judicial custody for bribe of 5 crores | ५ कोटींची लाच देणाऱ्या आमदारास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

५ कोटींची लाच देणाऱ्या आमदारास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हैदराबाद : तेलंगणा विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या बाजूने मतदान करवून घेण्यासाठी एका नामनिर्देशित आमदारास लाच देताना रंगेहात अटक झालेले तेलगू देसम पार्टीचे आमदार रेवंत रेड्डी यांना न्यायालयाने सोमवारी १४ दिवस न्यायालयीन कोठडी दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक ए.के. खान यांनी या घटनेची माहिती दिली. नामनिर्देशित आमदार एल्विस स्टिफन्सन यांच्या तक्रारीच्या आधारे एसीबीने रेड्डी, सेबॅस्टिअन हॅरी आणि उदय सिम्हा यांना रविवारी रात्री ताब्यात घेतले होते.जाबजबाबानंतर त्यांना अटक करण्यात येऊन सोमवारी सकाळी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर करण्यात आले.
न्यायालयाने अटक होण्यापूर्वी रेड्डी यांना आमदार कोट्यातून परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली. दरम्यान, या घटनेमुळे नाचक्की झालेल्या मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील तेदेपाने सारवासारव करीत पक्षाला बदनाम करण्याच्या हेतूने खोटा आरोप लावण्यात आल्याचा दावा केला आहे. तर या कथित सौद्याबद्दल आमच्याकडे दृकश्राव्य पुरावा असून हा एक दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असल्याचे खान यांनी सांगितले. याप्रकरणी आणखी एक आरोपी एम. जेरुसलम याचा शोध पोलीस घेत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: 14-day judicial custody for bribe of 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.