विदेशातील सोहळ्यांवर 14 कोटी खर्च!
By Admin | Updated: August 6, 2014 01:51 IST2014-08-06T01:51:57+5:302014-08-06T01:51:57+5:30
विदेशातील पर्यटन सोहळ्य़ांवर गोवा सरकारचा 14 कोटींचा खर्च झाला असून त्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विदेशातील सोहळ्यांवर 14 कोटी खर्च!
पणजी : विदेशातील पर्यटन सोहळ्य़ांवर गोवा सरकारचा 14 कोटींचा खर्च झाला असून त्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी आमदारांनी मंगळवारी विधानसभेत या मुद्दय़ावर पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना धारेवर धरले.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. 1 मार्च 2क्12 पासून आजर्पयत पर्यटनमंत्री व पर्यटन सचिवांनी किती विदेश दौरे केले, अशी विचारणा त्यांनी केली. विदेशातील रोड शो, प्रदर्शने, ट्रॅव्हल मार्टवर किती खर्च झाला, अशीही विचारणा त्यांनी केली होती. त्यावर पर्यटनमंत्र्यांनी खर्चाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात सादर केली. त्यानंतर रेजिनाल्ड यांनी मंत्र्यांच्या उत्तरातील काही दोषांवर बोट ठेवले. विदेशातील एक सोहळा विन्सन ग्राफिक्स कंपनीने केला असल्याचे उत्तर आता देण्यात आले आहे मात्र यापूर्वी भलत्याच कंपनीचे सांगितल्याचे रेजिनाल्ड यांनी निदर्शनास आणून दिले.
विदेशवा:या करण्यापूर्वी गोव्याचे ‘मार्केटिंग’ करण्याचे काही नियोजन केले होते का, असा सवाल अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केला. विदेशातील सोहळ्य़ांत घोटाळा झाला असून त्यावर विधानसभेत
अर्धा तास चर्चेची मागणी सरदेसाईंनी केली.
घोटाळ्यांचे आरोप सिद्ध करणारे पुरावे देतो, असेही ते म्हणाले. त्यावर सभागृहाच्या पटलावर पुरावे ठेवण्याची सूचना सभापतींनी केली.
पंतप्रधानांनी विदेश दौ:यांवर र्निबध घातलेले असताना भाजपाचेच मंत्री मोदींच्या सूचनांचे उल्लंघन करत आहेत, असे सरदेसाई म्हणाले. मंत्री परुळेकर यांनी विरोधकांचा आरोप फेटाळला. (खास प्रतिनिधी)