शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे 'जय किसान'; 14 पिकांच्या हमीभावात घसघशीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 21:13 IST

मोदी सरकारनं शेतक-यांना सुखद धक्का दिला आहे. खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवत शेतक-यांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारनं प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकारनं शेतक-यांना सुखद धक्का दिला आहे. खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवत शेतक-यांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारनं प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. हमीभाव वाढवलेल्या पिकांमध्ये गहू, तांदूळसह इतर 14 पिकांचा समावेश आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटलनं वाढ करण्यात आली असून, 14 पिकांचा हमीभाव दीडपटीनं वाढवला आहे. त्यामुळे खरिपात शेती करणा-या शेतक-यांचा याचा फायदा होणार आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारने 2008-09 वित्त वर्षात किमान आधारभूत किमतीत 155 रुपयांची घसघशीत वाढ केली होती. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा संपुआ सरकारला फायदा झाला होता.तोच फॉर्म्युला मोदी सरकारनं वापरल्याची आता चर्चा आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान यासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणुकांचे वेध लागतील. 2014च्या निवडणुकीआधी मनमोहन सिंग सरकारने शेतमालाच्या किमान आधारभूत किमतींत फार मोठी वाढ केली नव्हती. त्याचा फटका संपुआ सरकारला लोकसभा निवडणुकीत बसल्याची राजकीय जाणकारांचं मत होतं. यंदा भाताला 1,750 रुपयांचा भाव असून, तूर, मूग, उडीद या डाळींच्या किमान आधारभूत किमतींत प्रति क्विंटल किमान 200 रुपयांची वाढ केली गेली आहे. किमान आधारभूत किमतींत 1.5 टक्के वाढ करण्याचे वचन सरकारने अर्थसंकल्पात दिले होते. त्यासाठी 15 हजार कोटी रुपये खर्च करण्यास सरकार तयार आहे. भात, अन्नधान्ये आणि काही डाळी यांच्या किमतींत वाढ केली गेली आहे. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी सरकार दरवर्षी किमान आधारभूत किमती घोषित करते.

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार