पानवाल्याला चक्क १३२ कोटी रुपयांचे वीजबिल
By Admin | Updated: October 24, 2014 15:03 IST2014-10-24T15:03:32+5:302014-10-24T15:03:32+5:30
हरियाणा महावितरण मंडळाने एका पानटपरी चालकाला थेट १३२ कोटी रुपयांचे वीजबिल पाठवले असून वीजबिलाची रक्कम पाहून ऐन दिवाळीत त्या पानटपरी चालकाला चांगलाच 'शॉक' बसला आहे.

पानवाल्याला चक्क १३२ कोटी रुपयांचे वीजबिल
ऑनलाइन लोकमत
सोनिपत, दि. २४ - वीज मंडळाचा भोंगळ कारभाराचा नमूना हरियाणामध्ये उघड झाला आहे. हरियाणा महावितरण मंडळाने एका पानटपरी चालकाला थेट १३२ कोटी रुपयांचे वीजबिल पाठवले असून वीजबिलाची रक्कम पाहून ऐन दिवाळीत त्या पानटपरी चालकाला चांगलाच 'शॉक' बसला आहे.
सोनिपतमधील एका गावात राजेश चौटाला यांची पानटपरी आहे. चौटाला यांना दरमहिन्याला साधारणतः ९०० रुपयांपर्यंतचे वीज बिल येते. मात्र ऑक्टोबरमध्ये चौटाला यांच्या हाती चक्क १३२ कोटी रुपयांचे वीजबिल आले आहे. हे वीजबिल बघून चौटाला चक्रावून गेले आहे. आकड्यांसोबतच अक्षरीही तिच रक्कम लिहीलेली असल्याचे चौटाला यांनी निदर्शनास आणून दिले. या बिलासंदर्भात हरियाणा महावितरणकडे तक्रार नोंदवणार असल्याचे चौटाला यांनी सांगितले. तर संगणकीय चुकीमुळे हा गोंधळ झाला असावा, चौकशी करुन योग्य बिल आकारु अशी ग्वाही हरियाणा महावितरणच्या अधिका-यांनी दिली.