१३ वर्षांच्या पूर्णाची एव्हरेस्टला गवसणी
By Admin | Updated: May 26, 2014 02:08 IST2014-05-26T02:08:33+5:302014-05-26T02:08:33+5:30
भारतीय गिर्यारोहणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात आपले नाव कोरून १३ वर्षांच्या मालवथा पूर्णा या किशोरीने रविवारी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई केली

१३ वर्षांच्या पूर्णाची एव्हरेस्टला गवसणी
हैदराबाद : भारतीय गिर्यारोहणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात आपले नाव कोरून १३ वर्षांच्या मालवथा पूर्णा या किशोरीने रविवारी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई केली आणि एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील सर्वाधिक युवा महिला गिर्यारोहक बनण्याचा विक्रम तिच्या नावे नोंदवला गेला़ पूर्णासोबत आंध्र प्रदेशच्या खम्मक जिल्ह्याची नवव्या इयत्तेतील विद्यार्थिनी साधनापल्ली आनंद कुमार (१६) हीसुद्धा होती़ रविवारी सकाळी आनंद आणि पूर्णाने एव्हरेस्ट सर केले़ दोघीही आंध्र प्रदेश सोशल वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनी आहेत़ ५२ दिवसांच्या मोहिमेनंतर आज पहाटे ६ च्या सुमारास त्यांनी एव्हरेस्टवर झेंडा रोवला़ या दरम्यान पूर्णा एव्हरेस्ट सर करणारी सर्वात युवा महिला गिर्यारोहक ठरली़ पूर्णा व साधनापल्ली यांना साहसी खेळातील १५० विद्यार्थ्यांमधून या मोहिमेसाठी निवडण्यात आले होते़ (वृत्तसंस्था)