एक कोटीच्या खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाची हत्या
By Admin | Updated: November 21, 2014 03:08 IST2014-11-21T03:08:13+5:302014-11-21T03:08:13+5:30
: दिल्लीच्या एका सराफा व्यापाऱ्याच्या १३ वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

एक कोटीच्या खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाची हत्या
नवी दिल्ली : दिल्लीच्या एका सराफा व्यापाऱ्याच्या १३ वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
उत्कर्ष असे त्याचे नाव असून तो शाळेतून घरी पायी परतत असताना अपहरणकर्त्यांनी त्याला पकडून नेले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोन केला होता. उत्कर्ष हा आनंदविहारमधील विवेकानंद शाळेत आठव्या वर्गात होता. अपहरणकर्त्यांनी त्याची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रेत फेकून दिले. उत्कर्षच्या थोरल्या भावाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडली. (लोकमत न्यूज नेटवर्क)