शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात वाहून गेला मुलगा; घरच्यांनी सोडली आशा, 24 तास गणरायाने केले त्याचे रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 20:37 IST

13 वर्षीय मुलाला समुद्राने गिळले; गणपतीच्या मूर्तीने दिला आधार

Surat Ganesh Visarjan News: गेल्या महिन्यात 29 सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनाच्या दिवशी देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. पण, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गुजरातच्या सूरतमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुरत शहरातील डुम्मस बीचवर कुटुंबासह फिरायला गेलेला एक 13 वर्षीय मुलगा समुद्राच्या लाटांसह वाहून गेला. 

अखेर मुलगा जिवंत सापडलासमुद्रकिनारी उभे त्याचे कुटुंबीय इच्छा असूनही त्याला मदत करू शकले नाहीत. मुलाच्या शोधासाठी सुरत पोलीस प्रशासनाने पाणबुडे आणि अग्निशमन दलाची मदत घेतली होती. अनेकवेळ शोधूनही त्या मुलाचा शोध लागला नाही. मुलाचा शोध न लागल्याने दुखी होऊन कुटुंबीय घरी परतले. पण, दुसऱ्या दिवशी एक चमत्कार घडला. समुद्रात हरवलेला मुलगा जिवंत असल्याचे समजले. देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण या मुलाच्या घटनेत एकदम तंतोतंत बसते.

गणरायाने वाचवले मुलाचे प्राणमिळालेल्या माहितीनुसार, लाटांसह खोल समुद्रात वाहून गेलेल्या मुलाला गणपतीच्या मूर्तीचा आधार मिळाला. गणपतीची मूर्ती पाण्यावर तरंगत होती, मुलगाही 24 तासांपेक्षा जास्त काळ मूर्तीला घट्ट पकडून बसला. दुसऱ्या दिवशी समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या भवानी बट येथील मच्छीमाराना मुलगा दिसला. त्यांनी त्या मुलाला बोटीवर घेऊन किनाऱ्यावर आणले आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. 

मुलाला गणेशमूर्तीचा आधार मिळाला नसता, तर कदाचित 13 वर्षीय लखन देवीपूजक जिवंत राहिला नसता. तिकडे मुलगा जिवंत असल्याची बातमी कानावर पडताच कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. मुलगा जिवंत असल्याची आशा सोडलेल्या कुटुंबासाठी ही बातमी चमत्कारापेक्षा कमी नव्हती. सध्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :GujaratगुजरातGanesh Visarjanगणेश विसर्जनPoliceपोलिसdrowningपाण्यात बुडणे