बिहारमध्ये विषारी दारूचे १३ बळी
By Admin | Updated: August 17, 2016 11:14 IST2016-08-17T11:08:57+5:302016-08-17T11:14:22+5:30
संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आलेली असतानाच राज्यातील गोपाळगंजमध्ये विषारी दारू प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू झाला

बिहारमध्ये विषारी दारूचे १३ बळी
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १७ - संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आलेली असतानाच राज्यातील गोपाळगंजमध्ये विषारी दारू प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने नव्हे तर आजारपणामुळे ते नागरिक मृत्यूमुखी पडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मृत्यू पावलेल्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर काही लोकांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या व त्यांना उलटीही झाली. त्यांना उपचारासांठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
आणखी वाचा :