१३... सारांश... जोड
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:04+5:302015-02-14T01:07:04+5:30
काटोल - खंडाळा मार्ग खड्ड्यात

१३... सारांश... जोड
क टोल - खंडाळा मार्ग खड्ड्यातकाटोल : तालुक्यातील काटोल - खंडाळा मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.***कामठी तालुक्यात मुरुम उत्खननकामठी : तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. या मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने चिकना परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ***खतांच्या टंचाईमुळे शेतकरी हवालदिलमेंढला : परिसरात सध्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. गव्हाला सध्या युरियाची गरज असताना तो बाजारात मिळेनासा झाल्याने शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांमध्ये रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***मांढळ, पचखेडीचा वीजपुरवठा खंडितमांढळ : पचखेडी येथील वीज उपकेंद्रावर मंगळवारी रात्री वीज कोसळल्याने संयंत्रामध्ये बिघाड निर्माण झाला आणि मांढळ व पचखेडी गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेळ लागल्याने या दोन्ही गावांमधील वीजपुरवठा ४८ तास खंडित होता. ***भिवापुरातील नाल्यांची साफसफाई अर्धवटभिवापूर : स्थानिक राजमार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केले होते. मात्र, सदर काम अर्ध्यातच सोडून देण्यात आले. त्यामुळे या नाल्यांच्या साफसफाईचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***