१३... सारांश
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:04+5:302015-02-13T23:11:04+5:30
९७ तरुणांनी केले रक्तदान

१३... सारांश
९ तरुणांनी केले रक्तदानहिंगणा : भीमसेना व सिओ हॉस्पिटलच्यावतीने एमआयडीसी परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ९७ तरुणांनी रक्तदान केले. यावेळी श्रीधर साळवे, मनोज बन्सोड, पंकज अंबादे, प्रदीप प्रधान, विजय डहाके उपस्थित होते. ***धामना येथे कुष्ठरोग निर्मूलन रॅलीधामना : व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने धामना येथे कुष्ठरोग निर्मूलन रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थी सहभागी झाले होते. नागरिकांना या आजाराविषयी माहिती देण्यात आली. यावेळी जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. यात आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.***जलालखेडा येथे वधू-वर परिचय मेळावाबेलोना : विदर्भ तेली समाज महासंघाच्यावतीने जलालखेडा येथे रविवारी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. विवाहोत्सुक तरुण-तरुणींनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***देवलापार येथे श्री गजानन महाराज प्रकटदिनदेवलापार : स्थानिक गुप्तगंगा संस्थान येथे श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात महापूजा, आरती, अभिषेक यासह अन्य कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ***मोहपा परिसरात अवैध वृक्षतोडकळमेश्वर : तालुक्यातील मोहपा परिसरात अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. यात आडजातचे वृक्ष तोडण्यात येत असून, त्या लाकडांचा उपयोग संत्र्याच्या पेट्या तयार करण्यासाठी केला जात असल्याचे काहींनी सांगितले. याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.***महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजननरखेड : तालुक्यातील मोवाड येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात पूजा, आरती, कलश यात्रा, महाप्रसाद आदींचे आयोजन केले असून, भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.***अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसानबेलोना : परिसरात बुधवारी सकाळी कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरींमुळे रबी पिकांचे नुकसान झाले आहे. कापणीला आलेला गहू लोळला असून, हरभऱ्याचा फुलोर झडला आहे. या पावसामुळे हाती आलेले रबीचे पीक उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.***