शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 16:21 IST

अनेक प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींकडे पाठवले राजीनामे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असताना आता विविध राज्यांचे प्रभारीदेखील राजीनामे देऊ लागले आहेत. आसामपासून पंजाबपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून राजस्थानपर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत पक्षाच्या 13 वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे राजीनामे राहुल गांधींकडे पाठवले आहेत. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. मात्र काँग्रेसनं त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. आपली जागा घेऊ शकेल अशी व्यक्ती शोधा, अशा सूचना राहुल यांनी पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसमधील 13 बड्या नेत्यांनी राहुल यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणूक निकाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्यानंतर पंजाब काँग्रसचे अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार आणि आसाम काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरांनी सोमवारी त्यांचे राजीनामे राहुल यांना पाठवले. जाखड यांनी गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपाचे सनी देओल यांच्याकडून पराभूत झाले. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. याशिवाय काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीदेखील राजीनामे दिले आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस