१३.... सावनेर... दारू

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30

(फोटो)

13 .... saubner ... alcohol | १३.... सावनेर... दारू

१३.... सावनेर... दारू

(फ
ोटो)
दारूची अवैध वाहतूक
दोघांना अटक : ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त
सावनेर : तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तेलगाव शिवारात केळवद पोलिसांनी २५ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूसह एकूण ६७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सचिन दिगांबर भगत (२३, रा. यशवंतनगर, हिंगणघाट) व गवळू बाळू फटिंग (५७, रा. हिंगणघाट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तेलगाव शिवारातून दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती केळवद पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी तेलगाव शिवारात नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करायला सुरुवात केली.
दरम्यान, एमएच-३२/एच-८५६७ क्रमांकाच्या मोटरसायकलवर दोन कॅन बांधल्या असल्याचे आढळून आले. संशय आल्याने पोलिसांनी सदर मोटरसायकल थांबवून त्या कॅनची तपासणी केली. त्या दोन्ही कॅनमध्ये इंग्लिश दारू भरली असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी मोटरसायकलसह कॅन व त्यातील दारू जप्त केली. ही दारू २५ हजार ८०० रुपये किमतीची असून, या कारवाईमध्ये एकूण ६७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी केळवद पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अमित काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक वाय. एल. पारधी, चंद्रशेखर गडेकर, देशमुख, संदीप आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 13 .... saubner ... alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.