१३... कामठी... फसवणूक

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:08+5:302015-02-13T23:11:08+5:30

फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

13 ... saddle ... fraud | १३... कामठी... फसवणूक

१३... कामठी... फसवणूक

वणूक करणाऱ्या दोघांना अटक
धान्याची अफरातफर : ट्रकला लावली बोगस नंबर प्लेट
कामठी : ट्रकला बोगस नंबर प्लेट लावून रोडवेजच्या कार्यालयातून धान्याची पावती घेत फसवणूक केल्याप्रकरणी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील दोघांना अटक करण्यात आली.
संतोषकुमार गौतम रामसरे (२०) व वीरेंद्रकुमार श्यामलाल गौतम (२७) दोघेही रा. अलाहाबाद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पसार असलेल्या आरोपीचे नाव कळू शकले नाही. या तिघांनी संगनमत करून त्यांच्याकडे असलेल्या युपी-७०/एटी-२३३५ क्रमांकाच्या ट्रकची नंबर प्लेट बदलविली. या ट्रकवर त्यांनी युपी-७०/एटी-३८५० क्रमांकाची नंबर प्लेट लावली. त्यानंतर त्यांनी रोडवेजच्या कार्यालयात जाऊन धान्याची उचल करण्याची पावती घेतली. या पावतीच्या आधारे त्यांनी प्रशांत ज्ञानेश्वर लाडेकर (३४, रा. नंदनवन, नागपूर) यांच्या गोदामातून तुरीच्या डाळीची उचल केली. ही तुरीची डाळ उत्तर प्रदेशातील लखनौ येथे न्यावयाची होती.
सदा ट्रकचालकाने बनावट कागदपत्र सादर करून तुरीच्या डाळीची उचल केल्याचे लक्षात येताच प्रशांत लाडेकर यांनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. कामठी पोलिसांनी सदर ट्रक बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रनाळा शिवारात अडवून दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४६५, ४६७, ४६८, ४२०, ४७१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 13 ... saddle ... fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.