१३... पारशिवनी... कापूस... जोड
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:49+5:302015-02-13T23:10:49+5:30
----------चौकट------

१३... पारशिवनी... कापूस... जोड
---- ------चौकट------भारनियमनाचा फटकापारशिवनी येथील कापूस संकलन केंद्रावर कापसाची आवक सध्या वाढली आहे. तिथे खरेदी करण्यात आलेला कापूस ठेवण्यास पुरेशी तथा पर्यायी जागा नसल्याने कापूस ठेवण्याची नवी समस्या निर्माण झाली आहे. भारनियमनामुळे ही समस्या अधिक तीव्र बनत चालली आहे. मार्केट यार्डात बैलगाड्या, ट्रॅक्टरसह अन्य वाहनांनी रोज कापूस आणला जात आहे. भारनियमनामुळे कापूस मोजण्यास विलंब होत असल्याचे संबंधितांनी सांगितले. पारशिवनी केंद्रावर आतापर्यंत एकूण ४८४ बैलगाड्या आणि ७९८ मिनीडोअर व मेटॅडोरमध्ये कापूस आणण्यात आला. या केंद्रावर कापूस खरेदीतून बाजार समितीला एक रुपया पाच पैसेप्रमाणे सेस फंड दिल्या जातो.--------------------------चौकट----------लोकप्रतिनिधींची उदासिनता या हंगामात शासनाने कापसाचा हमीभाव जाहीर करताना भेदभाव केल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला होता. मध्यंतरी पारशिवनी येथे आ. डी.एम. रेड्डी यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या कापूस संकलन केंद्रावर अडवणूक केली जात असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी जनता दरबारात केली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पारशिवनी येथे आले असता, काही शेतकऱ्यांनी यांना निवेदन सादर करून ही समस्या मांडली होती. मात्र, ही समस्या सोडविण्यास कुणीही पुढाकार घेतला नाही. काँग्रेेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेही लक्ष द्यायला तयार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.--------------कोट--------कापूस संकलन केंद्रावर भेदभाव केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. कापूस खरेदीच्या वेळी बाजारात विक्रीस आणलेल्या कापसाची प्रत पाहूनच आम्ही खरेदीचे दर ठरवितो. काही शेतकरी कापसाचे वजन अधिक भरावे यासाठी पाणी ओतलेला कापूस विक्रीसाठी आणतात. अशा कापसाची आम्ही खरेदी करीत नाहीत. काही बैलगाड्यातील कापसाची प्रत तिसऱ्या श्रेणीची असते. त्यामुळे त्यांना तुलनेत कमी भाव दिला जात असल्याने शेतकरी नाराज होतात. काही शेतकरी वरिष्ठांकडे तक्रारी करतात. मात्र, याला आमचा नाईलाज आहे. - एन. ए. पाटीलकापूस प्रत निरीक्षक (ग्रेडर)--------