१३... पारशिवनी... कापूस
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30
(फोटो)

१३... पारशिवनी... कापूस
(फ ोटो)कापूस मोजणीसाठी शेतकरी ताटकळतआवक वाढली : संकलन केंद्रावर कापूस उत्पादकांची थट्टापारशिवनी : शासनाच्या उदासीन धोरणांमुळे भाव वाढण्याच्या आशेवर असलेल्या कापूस उत्पादकांच्या पदरी शेवटी निराशाच पडली. भाव वाढण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी कापूस संकलन केंद्रांवर आणणे सुरू केले आहे. त्यातच आवक वाढल्याने कापूस मोजण्यासाठी शेतकऱ्यांना संकलन केंद्रावर ताटकळत राहावे लागत आहे. मात्र, समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असले तरी तुलनेत भाव वाढले नाही. त्यातच खासगी व्यापारी कापूस खरेदीसंदर्भात कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव सीसीआयच्या (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. यासाठी शासनाने सीसीआयच्या माध्यमातून जिल्ह्यात नागपूर, हिंंगणा, काटोल-नरखेड, पारशिवनी, सावनेर, रामटेक, कळमेश्वर व उमरेड या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करून कापूस खरेदीला सुरुवात केली. यंदा प्रतिकूल वातावरणामुळे शेतातील कापूस घरी यायला विलंब झाला. त्यामुळे कापूस बाजारातही उशिरा पोहोचला. सीसीआयने सुरुवातीला प्रति क्विंंटल ४ हजार ५०० रुपये भावाप्रमाणे केवळ १० दिवस कापसाची खरेदी केली. त्यानंतर भाव कोसळल्याने मध्यंतरी काही केंद्र बंदही करण्यात आले होते. नंतर ते पूर्ववत सुरू करण्यात आले. हल्ली बाजारात कापसाची आवक वाढली आहे. पारशिवनी येथील कापूस संकलन केंद्र दी नरेंद्र जिनिंंग-प्रेसिंंगच्या आवारात सुरू करण्यात आले. तिथे २८ हजार ८६५ क्विंंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात शेतकऱ्यांना वेगवेगळा भाव दिला जातो. कापसाचा दर हा कापूस पणन महासंघाचे ग्रेडर ठरवित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कापसाची प्रत पाहून ४ हजार २०० रुपये, ३ हजार ९५०, ३ हजार ९१० आणि ३ हजार ८५१ रुपये प्रति क्विंंटलप्रमाणे कापूस खरेदी केला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी रोज १ हजार ते १ हजार २०० क्विंंटल कापसाची खरेदी केली जात असल्याचे संबंधितांनी सांगितले. (प्रतिनिधी)