शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात विवाह समारंभात घुसला ट्रक, 13 जणांचा मृत्यू, 18 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 10:11 IST

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे.

प्रतापगड- राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका लग्नाचा समारंभ सुरू होता. त्याचदरम्यान त्या लग्न समारंभात एक ट्रक घुसला. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं तो ट्रक थेट लग्न समारंभात पाहुणे मंडळी उपस्थित असलेल्या ठिकाणी गेला अन् या अपघातात चार लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला.तर जवळपास 18हून अधिक लोक जखमी आहेत. त्या भागातील सर्कल अधिकारी विजय पाल सिंह संधू म्हणाले, निंबाहेडाहून बांसवाडा येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 113वर ही घटना घडली आहे. या महामार्गावर रामदेव मंदिराजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकवरील चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूलाच सुरू असलेल्या लग्न समारंभात घुसला. या अपघातात चार लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण जखमी आहेत.संधू म्हणाले, जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अपघातातील मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांपैकी दौलतराम (60), भारत (30), शुभम (5), छोटू (5), दिलीप (11), अर्जुन (15), ईशु (19), रमेश (30) आणि करण (28) यांची ओळख पटली आहे. बिंदोली येथे सुरू असलेला हा लग्न समारंभ रात्रीच्या वेळेस कदाचित ट्रक ड्रायव्हरला दिसला नसावा, त्यामुळेच दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांबरोबर माझी सहवेदना आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतोय, असंही मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात