पाक तुरुंगात १३ भारतीयांचा मृत्यू

By Admin | Updated: May 5, 2016 02:56 IST2016-05-05T02:56:57+5:302016-05-05T02:56:57+5:30

पाकिस्तानच्या विविध तुरुंगांमध्ये २0१३ पासून आतापर्यंत १३ भारतीय कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी बुधवारी लोकसभेत दिली.

13 Indians die in Pak jail | पाक तुरुंगात १३ भारतीयांचा मृत्यू

पाक तुरुंगात १३ भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या विविध तुरुंगांमध्ये २0१३ पासून आतापर्यंत १३ भारतीय कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी बुधवारी लोकसभेत दिली. अलीकडेच किरपाल सिंग याचाही मृत्यू तेथील कारागृहात झाला होता.
या काळात विविध देशांत ४९ भारतीय मरण पावल्याचे तेथील भारतीय दुतावासांची माहिती असून, त्यात १३ जण पाकिस्तानी तुरुंगातील असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, किरपाल सिंग यांच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी भारताने त्या देशाकडे केली आहे. किरपाल सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे पाकिस्तानने कळवले आहे.

Web Title: 13 Indians die in Pak jail