१३... गुन्हे... जोड
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:58+5:302015-02-13T23:10:58+5:30
मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

१३... गुन्हे... जोड
म लाची विष प्राशन करून आत्महत्यानरखेड : मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थुगाव (देव) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. रितेश विकास चोरे (१५, रा. खरबडी, ता. नरखेड) असे मृत मुलाचे नाव आहे. रितेश हा काही दिवसांपासून थुगाव (देव) येथे राहायचा. दरम्यान, त्याने गुरुवारी सायंकाळी विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्याला लगेच उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीसपाटील सुरेंद्र भागवत सोनुले (२९, रा. थुगावदेव) यांच्या तक्रारीवरून जलालखेडा पोलिसाांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.***