१३... अपघात... इंट्रो
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30
वेगवेगळ्या अपघातात चार ठार

१३... अपघात... इंट्रो
व गवेगळ्या अपघातात चार ठारमृतांमध्ये चिमुकलीचा समावेश : बाजारगाव, काटोल, वेलतूर व एमआयडीसी परिसरातील घटना नागपूर : जिल्ह्यातील कोंढाळी, काटोल, वेलतूर व हिंगणा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपघाताच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, तिघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दीड वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव परिसरातील अपघातात मुलीचा मृत्यू झाला असून, तिचे वडील गंभीर जखमी झाले. काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल फाटा परिसरातील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढा (कला) येथे जीपच्या धडकेत चिमुकलीचा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा मृत्यू झाला.