१२९ कोटींची थकबाकी गाळेधारकांकडून टाळाटाळ: मनपाकडूनही दुर्लक्ष
By Admin | Updated: December 23, 2015 23:58 IST2015-12-23T23:58:13+5:302015-12-23T23:58:13+5:30
जळगाव : शहरातील विविध भागातील व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडे कराची तीन वर्षांची १२९ कोटी १३ लाख ८९ हजारांची थकबाकी असून या वसुलीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरी हितसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली असून यामुळेच महापालिकेची मोठी कोंडी झाली असल्याचे म्हटले आहे.

१२९ कोटींची थकबाकी गाळेधारकांकडून टाळाटाळ: मनपाकडूनही दुर्लक्ष
ज गाव : शहरातील विविध भागातील व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडे कराची तीन वर्षांची १२९ कोटी १३ लाख ८९ हजारांची थकबाकी असून या वसुलीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरी हितसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली असून यामुळेच महापालिकेची मोठी कोंडी झाली असल्याचे म्हटले आहे. शहरात मनपा मालकीचे विविध भागात व्यापारी संकुले आहेत. यात सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट, जुने बी.जे. माकेर्ेट, भास्कर मार्केट अशी काही संकुले आहेत. बहुतांश गाळेधारकांची गाळे वापराची मुदत संपली आहे. हे काळे पुन्हा वापरास देण्याची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. भोगवटा करीत असलेल्या गाळेधारकांकडून करांच्या रकमा वसूल करणे बंधनकारक आहे. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार कर आकारावयाच्या धोरणासंबंधी मनपा प्रशासनाने दिलेल्या ठरावास महासभेनेही मान्यता दिली आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ या कालावधीचा गाळे वापरासंबंधीचा कर आकारणी बिले गाळेधारकांना वेळोवेळी देण्यात आली आहे. गाळेधारकांना ३१ मार्च २०१५ पावेतो थकीत असलेल्या कराची एकत्रित रकम १२९ कोटी १३ लक्ष ८९ हजार ५७७ एवढी झाली आहे. बिले देऊनही गाळेधारकांनी रकमा भरलेल्या नाहीत. बिले भरण्यास नागरिकांना ज्या पद्धतीने प्रोत्साहित केले जाते त्या पद्धतीने या गाळेधाराकांना प्रोत्साहित करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.