देशात उष्णतेच्या लाटेचे १२४२ बळी

By Admin | Updated: May 27, 2015 23:51 IST2015-05-27T23:51:14+5:302015-05-27T23:51:14+5:30

देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १२४२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक ११९२ बळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आहेत.

1242 victims of the heat wave in the country | देशात उष्णतेच्या लाटेचे १२४२ बळी

देशात उष्णतेच्या लाटेचे १२४२ बळी

नवी दिल्ली : देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १२४२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक ११९२ बळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार आंध्र प्रदेशात ८५२ लोक उष्णतेने मृत्युमुखी पडले तर तेलंगणात मागील २४ तासातील ७४ बळींसह एकूण ३४० जणांना मृत्यू झाला.
हैदराबादमध्ये हवामान विभागाचे संचालक वाय.के. रेड्डी यांनी सांगितले की, तेलंगणात पुढील दोन दिवस आणि तटवर्तीय आंध्र प्रदेशात तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील. अधिक काळ उन्हात बाहेर राहिल्याने मृत्यू होऊ शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: 1242 victims of the heat wave in the country