बनावट चावी वापरून १.२१ लाखाचे दागिने पळविले
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:35+5:302015-01-22T00:07:35+5:30
बनावट चावी वापरून १.२१ लाखाचे दागिने पळविले

बनावट चावी वापरून १.२१ लाखाचे दागिने पळविले
ब ावट चावी वापरून १.२१ लाखाचे दागिने पळविलेनागपूर : बनावट चावीने फ्लॅटचे कुलूप उघडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, बँकेचे पासबुक असा एकूण १.२१ लाखाचा मुद्देमाल पळवून नेल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल बबन दुधबरवे (२३) रा. फ्लॅट नं. ५०७, पाचवा माळा, राय उद्योग, गुलमोहर अपार्टमेंट टेका, कामठी रोड हे मंगळवारी २० जानेवारीला आपल्या फ्लॅटला कुलूप लावून नोकरीवर गेले होते. अज्ञात चोरट्याने सकाळी १०.३० ते रात्री ८.४० दरम्यान बनावट चावीने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १.२१ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला.