महापालिकेकडून सीएनजी किटसाठी १२०० रिक्षांना अनुदान
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:37+5:302015-07-10T23:13:37+5:30
पुणे : शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवून घ्यावे याकरिता महापालिकेच्यावतीने १२०० रिक्षाचालकांना १ कोटी ४४ लाख रूपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत २०११ पासून २० कोटी रूपयांच्या अनुदानाचे रिक्षाचालकांना वाटप करण्यात आले आहे.

महापालिकेकडून सीएनजी किटसाठी १२०० रिक्षांना अनुदान
प णे : शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवून घ्यावे याकरिता महापालिकेच्यावतीने १२०० रिक्षाचालकांना १ कोटी ४४ लाख रूपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत २०११ पासून २० कोटी रूपयांच्या अनुदानाचे रिक्षाचालकांना वाटप करण्यात आले आहे.शहरामध्ये ४५ हजार परवानाधारक रिक्षाचालक आहेत. जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवावे याकरिता महापालिकेच्यावतीने प्रोत्साहन दिले जात आहे. पालिकेच्यावतीने २०११-१२ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १५ हजार रिक्षाचालकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यंदा रिक्षाचालकांच्या अनुदानामध्ये निम्म्याने कपात करण्यात आली आहे, मागील वर्षी २ कोटी ६० लाख रूपयांची तरतुद सीएनजी किट अनुदानासाठी करण्यात आली होती. रिक्षाचालकांना सीएनजी किटसाठी रिक्षा परवाना, आरसी पुस्तक, आरटीओची मान्यता, सीएनजी किट बसविल्याची पावती आदी कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. चौकटवर्ष रिक्षांची संख्याअनुदान२०११-१२१६६० २ कोटी२०१२-१३८७३९ १२ कोटी२०१३-१४१६५० २ कोटी२०१४-१५२१६१ २.६० कोटी२०१५-१६१२०० १. ४४ कोटी