१,२०० जीव हाेते धाेक्यात, लष्कराने केली सुटका; बर्फवृष्टीत अडकलेल्यांचा जीव भांड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 08:07 AM2023-12-15T08:07:49+5:302023-12-15T08:10:05+5:30

बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे पूर्व सिक्कीममधील उंच भागात अडकलेल्या १,२१७ पर्यटकांची भारतीय लष्कराने सुटका केली आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

1,200 lives lost, rescued by army; The lives of those trapped in the snow are in the pot | १,२०० जीव हाेते धाेक्यात, लष्कराने केली सुटका; बर्फवृष्टीत अडकलेल्यांचा जीव भांड्यात

१,२०० जीव हाेते धाेक्यात, लष्कराने केली सुटका; बर्फवृष्टीत अडकलेल्यांचा जीव भांड्यात

गंगटोक : बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे पूर्व सिक्कीममधील उंच भागात अडकलेल्या १,२१७ पर्यटकांची भारतीय लष्कराने सुटका केली आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने बुधवारी रात्री उशिरापर्यंत बचाव मोहीम सुरू ठेवली. पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि त्यांना निवारा, उबदार कपडे, वैद्यकीय मदत आणि गरम जेवण देण्यात आले. गंगटोक येथे त्यांची परत जाण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यांनी लष्कराचे आभार मानले आहेत.

ऑक्टोबरमध्येही सिक्कीममध्ये नुकसान

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ढगफुटीमुळे सिक्कीममध्ये प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी अनेकांना जीव गमवावा लागला हाेता.

बरॅक केल्या रिकाम्या...

अडकलेल्या पर्यटकांच्या निवासाची सोय करण्यासाठी सैनिकांनी त्यांच्या बरॅकही रिकाम्या केल्या. हे पर्यटक पूर्व सिक्कीममध्ये अडकले होते जिथे हवामान खूपच खराब झाले आहे.

Web Title: 1,200 lives lost, rescued by army; The lives of those trapped in the snow are in the pot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.