शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर आदित्यच्या ‘इंटेलिजन्स’ला गुगलने दिले १.२० कोटींचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:49 IST

बंगळुरु येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी-बी) या संस्थेत शिकणाऱ्या व मूळ मुंबईचा रहिवासी असलेला आदित्य पालिवाल (२२ वर्षे) या कुशाग्र युवकाला गुगलने नोकरी देऊ केली

बंगळुरु  - येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी-बी) या संस्थेत शिकणाऱ्या व मूळ मुंबईचा रहिवासी असलेला आदित्य पालिवाल (२२ वर्षे) या कुशाग्र युवकाला गुगलने नोकरी देऊ केली असून, त्याला वार्षिक १ कोटी २० लाख रुपये इतका पगार मिळणार आहे.गुगलच्या न्यूयॉर्क येथील कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) संशोधन विभागात तो काम करणार असून, तेथे तो १६ जुलै रोजी रुजू होईल. आयआयआयटी-बीच्या रविवारी झालेल्या दीक्षान्त समारंभात आदित्यला पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानातील संशोधनासंदर्भात गुगलने जगभरात नुकतीच एक परीक्षा घेतली होती. त्यातील ६ हजार परीक्षार्थींमधून ५० जणांची अंतिम निवड करण्यात आली. त्यात आदित्यचा समावेश होता.२०१७-१८ या कालावधीसाठी पार पडलेल्या एसीएम इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रॅमिंग (आयसीपीसी) या स्पर्धेत आदित्य अंतिम फेरीत पोहोचला होता.कॉम्प्युटर लँग्वेज कोडिंग या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया या स्पर्धेत आदित्य पालिवाल, सिमरन डोजानिया व श्याम के. बी. यांचा संघ सहभागी झाला होता. या वर्षी या स्पर्धेत १११ देशांतील ३,९०८ विद्यापीठांतील ५० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. बंगळुरू शहरात शिक्षणासाठी आदित्यने पाच वर्षे वास्तव्य केले होते.गुगलने गेल्या मार्च महिन्यात माझी नोकरीसाठी निवड केली होती. इतकी मोठी संधी मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. गुगलमध्ये मी नक्कीच उत्तम कामगिरी करून दाखवेन. - आदित्य पालिवाल

टॅग्स :Studentविद्यार्थीgoogleगुगलjobनोकरी