१२... सारांश... जोड
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:06+5:302015-02-13T00:38:06+5:30
मनसर येथे गायत्री महायज्ञ

१२... सारांश... जोड
म सर येथे गायत्री महायज्ञमनसर : स्थानिक रामधाम येथे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी गायत्री महायज्ञाचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत कलश यात्रा काढण्यात येणार असून, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत गायत्री यज्ञ पार पडेल. भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***मेंढला शिवारात अवकाळी पाऊसमेंढला : परिसरात अवकाळी पावसाने बुधवारी सकाळी हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अनेकांच्या शेतातील गहू जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. हरभऱ्याचा खार धुतल्याने तसेच फुलोर झडल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे.***वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसानदेवलापार : परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर विपरीत परिणाम झाला आहे. काही शिवारातील मोहोर गळाला असून, त्यामुळे गावरान आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.***पांदण रस्त्यांची दैनावस्थानरखेड : तालुक्यातील बहुतांश पांदण रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करण्यास तसेच शेतीमालाची ने-आण करण्यास त्रास होत असल्याने पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***