१२... सारांश
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:13+5:302015-02-13T00:38:13+5:30
खापरखेडा-भानेगाव येथे पालखी यात्रा

१२... सारांश
ख परखेडा-भानेगाव येथे पालखी यात्राखापरखेडा : भानगाव येथील हनुमान मंदिरातून मंगळवारी सकाळी पालखी यात्रा काढण्यात आली. ही पायी यात्रा रामटेक गडमंदिर येथे नेण्यात आली. सिल्लेवाडा कॉलरीचे व्यवस्थापक आर. ठाकरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ४० वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. ***त्रिशूळ घेऊन भाविक चौरागडला रवानाखापरखेडा : स्थानिक ३१ भाविक त्रिशूळ घेऊन मध्य प्रदेशातील चौरागडला जाण्यासाठी नुकतेच रवाना झाले. १५१ किलो वजनाच्या या त्रिशूळाचा तिथे अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर त्या त्रिशूळाची कोलार नदीच्या तीरावर महाशिवरात्रीला स्थापना केली जाईल.***टाकळघाट येथे माकडांचा धुमाकूळकान्होलीबारा : नजीकच्या टाकळघाट येथे माकडांनी चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात घरांचे नुकसान होत असून, नागरिक व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***अवैध दारू विक्री बंद करा!हिंगणा : तालुक्यातील डिगडोहसह अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने ही दारू विक्री कायमची बंद करावी व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. ***धर्मापुरी येथे मंडईचे आयोजनधर्मापुरी : धर्मापुरी येथे मंडई व कुस्त्यांच्या आमदंगलीचे आयोजन करण्यात आले. विजेत्या पहेलवानांना बक्षिसे देण्यात आली. मंडईिनमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडले. या मंडईला परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.धर्मापुरी येथे जाहीर सभाधर्मापुरी : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची धर्मापुरी येथे जाहीर सभा पार पडली. यात स्थानिक व परिसरातील विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सभेला निशा सावरकर, शकुंतला हटवार यांच्यासह अन्य नेते प्रामुख्याने उपस्थित होते.***डॉक्टरअभावी गरीब रुग्णांची गैरसोयनिहारवाणी : स्थानिक शासकीय दवाखान्यात डॉक्टर नियमित हजर राहत नसल्याने गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. स्थानिक बायजाबाई वैद्य (६०) या महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यामुळे गावात असंतोष निर्माण झाला आहे. ***