१२... सारांश

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30

कुहीत कॅन्सर प्रतिबंधक कार्यशाळा

12 ... summary | १२... सारांश

१२... सारांश

हीत कॅन्सर प्रतिबंधक कार्यशाळा
कुही : स्थानिक राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात कॅन्सर प्रतिबंधक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अतिथी म्हणून घनश्याम धवड, डॉ. किरण सोनेकर, डॉ. प्रवीण नायडू, प्राचार्य डॉ. जयवंत जगताप उपस्थित होते. यात कॅन्सरविषयी माहिती देण्यात आली. संचालन प्रा. गजानन मांडेकर यांनी केले. डॉ. कटमुसरे यांनी आभार मानले.
***
मारोडी येथे वधू - वर परिचय मेळावा
मौदा : मारोडीतील ग्रामविकास अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणाम रविवारी (दि. १४) कुणबी समाज संस्थेच्या वतीने वधूू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. विवाहोत्सुक तरुण-तरुणींनी व पालकांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
अवैध रेतीवाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्था
खापा : परिसरातील रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक केली जाते. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता बळावल्याने तसेच रात्रीच्यावेळी या वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने या रेतीवाहतुकीला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
तारसा चौरस्ता झाला धोकादायक
तारसा : तारसा ज्वॉईंट येथे रामटेक, मौदा, कन्हान व अरोलीला जाणारे मार्ग एकत्र येतात. या मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असल्याने तारसा चौरस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून, हा चौरस्ता आता धोकादायक बनला आहे. त्यामुळे या चौरस्त्याची दुरुस्ती करण्याची वाहनधारकांनी केली आहे.
***
गतिरोधक तयार करण्याची मागणी
रामटेक : स्थानिक बसस्थानक चौकात वाहनांची सतत वर्दळ असते. हा शहरातील मुख्य मार्ग आहे. अनियंत्रित वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अनियंत्रित वाहनांना नियंत्रित करण्यासाठी बसस्थानक परिसरात गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
सिमेंटरोड तयार करण्याची मागणी
मेंढला : नजीकच्या वाढोणा येथील काही अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना रहदारी करताना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून वाढोणा येथे सिमेंटरोड तयार करावे, यासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
***

Web Title: 12 ... summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.