शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 08:31 IST

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये उन्हाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. प्रचंड उन्हामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. औरंगाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक राज्यांप्रमाणेच बिहार आणि झारखंडमध्येही कालचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. पलामू जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या तीन दिवसांपासून पलामूचे कमाल तापमान ४७ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. सूर्य उगवताच उष्णतेमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाल्याचं लोक सांगत आहेत.

बिहारमध्येही अशीच परिस्थिती आहे. बक्सरमध्ये सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने बुधवारी सर्व खासगी आणि सरकारी शाळा, कोचिंग संस्था आणि अंगणवाडी केंद्रे ८ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेखपुरा, बेगुसराय, मुझफ्फरपूर आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमधून आणि इतर भागांमध्ये कडक उन्हामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी बेशुद्ध पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. 

येत्या काही दिवसांत बिहारच्या अनेक भागात भीषण गरमी कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. औरंगाबाद (४६.१ अंश सेल्सिअस), देहरी (४६अंश सेल्सिअस), गया (४५.२ अंश सेल्सिअस), अरवल (४४.८ अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (४४.१ अंश सेल्सिअस) या ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पाटणा येथे कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार 'या' सूचना केल्या जात आहेत 

- उन्हात जाणं शक्यतो टाळा. उष्णतेची लाट/उष्णतेच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या.- शक्य तितके पाणी प्या. तहान लागली नसली तरी पाणी प्या.- हलक्या रंगाचे घाम शोषणारे सुती कपडे घाला.- घराबाहेर पडताना सनग्लासेस, छत्री, टोपी यांचा वापर करा.- तीव्र सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्री वापरा.- ताक, लस्सी, नारळपाणी, लिंबू पाणी, फळांचा ज्यूस प्या. - अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. 

टॅग्स :BiharबिहारHeat Strokeउष्माघातJharkhandझारखंडTemperatureतापमान