शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 22:12 IST

Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे.

ठळक मुद्दे२६ मे रोजी शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलनदेशभरातील १२ विरोधी पक्षांनी दिला पाठिंबा१२ पक्षांचे संयुक्त निवेदन

नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांना गेल्या अनेक दिवसांपासून विरोध करण्यात येत आहे. दिल्लीतील सीमांवर आंदोलक शेतकरी अजूनही केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता ६ महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. समर्थन पत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ५ विद्यमान मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे. (12 opposition parties support to samyukta kisan morcha call to observe a countrywide protest day on May 26) 

गेल्या ६ महिनांपासून देशभरातील विविध राज्यांमधील शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किमान ४० संघटनांचा संघ असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या दिवशी देशभरात 'काळा दिवस' पाळला जाणार आहे आणि संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला १२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. 

‘ते’ कंपनीचं अधिकृत वक्तव्य नाही; सरकारवरील टीकेनंतर सीरमचं स्पष्टीकरण

१२ पक्षांचे संयुक्त निवेदन

देशभरातील १२ विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत देशव्यापी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या समर्थन पत्रावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांसारख्या बड्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला 

वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत

केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घ्यावे, या प्रमुख मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना कोरोना संकटाच्या काळात भरघोस मदत करावी. स्वामीनाथन आयोगाच्या सूचना, किमान आधारभूत किंमत कायदा तयार करावा, अशा काही मागण्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठेवण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliticsराजकारण