झारखंडमध्ये १२ नक्षलवादी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2015 10:33 IST2015-06-09T10:31:13+5:302015-06-09T10:33:44+5:30
पोलिस व सीपीआरएफच्या जवानांच्या संयुक्त कारवाईत झारखंडमध्ये १२ नक्षलवादी ठार झाले आहेत.

झारखंडमध्ये १२ नक्षलवादी ठार
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. ९ - पोलिस व सीपीआरएफच्या जवानांच्या संयुक्त कारवाईत झारखंडमध्ये १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री मलामू जिल्ह्यात जवानांनी ही कारवाई केली असून त्या एकही जवान जखमी झालेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलामू जिल्ह्यातील सतबरवा जंगलातील एका रस्त्यावरून माओवादी जात असल्याची खबर जवानांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून माओवादी जात असलेल्या गाडीवर गोळीबार करत १२ जणांना ठार केले. पोलिसांनी माओवाद्यांकडून ८ रायफल्स तसेच २२० काडतुसेही जप्त केली आहेत.