शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! १२ मोबाईल, परदेशी नाणी, केटीएम बाईक, दागिने; भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही थक्क झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:46 IST

पोलिसांनी एका भिकाऱ्याची केटीएम बाईक, चांदीचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू जप्त केल्या आहेत.

बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका महिला भिकारीच्या घरी छापा टाकला, या छाप्यात सापडलेल्या वस्तू पाहून अनेकांना धक्काच बसला. यामध्ये विदेशी नाणी, केटीएम बाईक, १२ मोबाईल, सोनं, चांदी अशा वस्तू आहेत. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चौकशीमध्ये या महिलेची ओळख  नीलम देवी अशी झाली, ती महिला मडवन भोज येथील रहिवासी आहे. ती बाहेरून आली होती आणि मडवन भोज येथील कालव्याच्या काठावर बांधलेल्या घरात राहत होती.

संपूर्ण देशात 'नॉनवेज'वर बंदी आणली पाहिजे; खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणीपोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही महिला परिसरात फिरून भीक मागायची. पोलिसांनी भिकारी महिलेला अटक केली आहे.

पोलीस ठाण्यात नीलम देवी आणि तिचा जावई चुटुक लाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलम देवी हिने घराच चोरीची बाईक आणि अन्य सामान ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  एक संशयीत व्यक्ती केटीएम बाईक घेऊन फिरत असल्याचीही माहिती मिळाली होती. पोलिसांनी लगेच नीलम देवीच्या घरी छापा टाकला.  घरातून एक केटीएम बाईक, चांदीचे अँकलेट, नेपाळी, अफगाणी आणि कुवेती चांदीचे नाणी, ईस्ट इंडिया कंपनीचा लोगो असलेले नाणे, चांदी आणि सोन्याचे दागिने आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही महिला बऱ्याच काळापासून परिसरात भीक मागत असल्याची माहिती मिळाली होती.

भीक मागण्यासह चोऱ्याही करायची

ती महिला लोकांना फसवून चोरीही करायची. तिच्या घरात मौल्यवान वस्तू चोरीच्या  असल्याची माहिती मिळाली. यानंतर महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला. पोलिसांनी महिलेला अटक केली आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. महिलेने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. सर्व सामान जप्त करण्यात आले आणि त्या महिलेला अटक करण्यात आली. 

पोलिसांनी महिलेच्या जावयालाही अटक केली. मडवान गावातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ मोबाईल फोन, एक चांदीचे नाणे, नेपाळी अफगाणी, कुवेती नाणे आणि अर्धा किलो चांदीसारखे दिसणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. भीक मागण्याव्यतिरिक्त, ती महिला गावात फिरून मच्छरदाणी विकायची काम करत होती. भिकारी बनून ती महिला गावातील ठिकाण शोधून त्याची माहिती जावयाला देत होती. यानंतर जावई चोरी करत होता.  एक नवीन केटीएम बाईक सापडली आहे. महिलेचा जावई फरार आहे, तिच्या अटकेतून टोळीतील इतरांची माहिती मिळेल. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, या सर्व वस्तू तिच्या जावयाच्या आहेत. ही परदेशी नाणी कुठून आली आणि ती तिथे का ठेवली. चोरीच्या वस्तू कुठून आल्या याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस