१२... खापरखेडा... अपघात
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:24+5:302015-02-13T00:38:24+5:30
(फोटो-पासपोर्ट)

१२... खापरखेडा... अपघात
(फ ोटो-पासपोर्ट)दुचाकीच्या धडकेत तरुण जखमीखापरखेडा : रोडच्या कडेने पायी जात असलेल्या तरुणाला भरधाव मोटरसायकलने उडविले. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-कामठी मार्गावर सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. ईश्वर चंद्रभान सोनभद्रे (३८, रा. खापरखेडा, ता. सावनेर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. ईश्वर व त्याचा मित्र विकास गेंदलाल कनोजे (३५, रा. खापरखेडा) हे दोघेही खापरखेडा - कोराडी मार्गाने पायी जात होते. दरम्यान, मागून भरधाव येणाऱ्या एमएच-३१/डीबी-३१७४ क्रमांकाच्या मोटरसायलने ईश्वरला जोरदार धडक दिली. त्याला लगेच नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. धडक देताच दुचाकीचालक वाहनासह पळून गेला. ईश्वर हा खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी विकासच्या तक्रारीवरून नागपुरातील धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दरम्यान, सदर घटनेचा तपास गुरुवारी खापरखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास रामआसरे मिश्रा, रोशन काळे व शैलेश वऱ्हाडे करीत आहे. (प्रतिनिधी)***