१२... खापरखेडा... रोड... जोड

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:11+5:302015-02-13T00:38:11+5:30

मात्र, त्या ठिकाणी मुरुम टाकण्यात आल्याचे दर्शवून बिलांची उचल करण्यात आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. या सर्व कामांचा माहिती फलक लावण्यात आल्याचे कागदोपत्री नोंदविण्यात आले असून, त्या फलकांच्या आधारे देयकांची उचल करण्यात आली. वास्तवात एकाही रस्त्याच्या कडेला फलक लावण्यात आला नाही.

12 ... khaparkheda ... road ... add | १२... खापरखेडा... रोड... जोड

१२... खापरखेडा... रोड... जोड

त्र, त्या ठिकाणी मुरुम टाकण्यात आल्याचे दर्शवून बिलांची उचल करण्यात आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. या सर्व कामांचा माहिती फलक लावण्यात आल्याचे कागदोपत्री नोंदविण्यात आले असून, त्या फलकांच्या आधारे देयकांची उचल करण्यात आली. वास्तवात एकाही रस्त्याच्या कडेला फलक लावण्यात आला नाही.
----------चौकट-----------
वेकोलि वसाहतीत निधीचा वापर
सिल्लेवाडा येथील वॉर्ड क्रमांक - २, ३, ४ व ५ मध्ये वेकोलि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असून, हा संपूर्ण परिसर सिल्लेवाडा वेकोलिच्या अखत्यारित आहे. या परिसरात बहुतांश सर्वच विकास कामे वेकोलि प्रशासनाच्या मार्फत केली जातात. दलित वस्ती सुधार योजनेेंतर्गत मिळणाऱ्या निधीचा वापर वेकोलि परिसरात करणे ही बाब नियमबाह्य आहे. याची जाणीव असतानाही स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी निधीचा वापर केला. सिल्लेवाडा येथे करण्यात आलेल्या सदर कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक साहित्य चाचणी प्रयोगशाळा नसल्याने तपासता आली नाही, असेही अहवालात नमूद केले आहे.
---------------
-----चौकट--------
वॉर्ड क्रमांक - ६ मधील घोळ
वॉर्ड क्रमांक - ६ मध्ये १४९.६३ मीटर लांबीचा सिमेंट रोड मंजूर करण्यात आला. या रस्त्याचे मोजमाप कुठेच नोंदविण्यात आले नाही. वास्तवात या वॉर्डामध्ये ३० मीटर रस्ता तयार करण्यात आला. याही रोडची जाडी इतर रस्त्यांप्रमाणे कमी असल्याचे आढळून आले. या रोडच्या आजूबाजूला एकही घर नसून, तो रोड गावाबाहेर तयार करण्यात आला असून, हा रोड नदीकडे जातो. दलित बांधव या रोडने नदीकडे कपडे धुण्यासाठी जात असल्याचा युक्तिवाद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला.
--------
लेखा परीक्षण करणे आवश्यक
या कामासाठी वापण्यात आलेल्या निधीचे लेखा परीक्षण करणे आवश्यक असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे. या सर्व कामांची चौकशी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता विनायक झोडापे आणि घनश्याम कावळे यांनी केली असून, सदर चौकशी अहवाल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांना सादर केला आहे. सदर कामे सावनेर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता यशवंत कोंबाडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. त्यावेळी राठोड हे बीडीओ होते. ही कामे सरपंच सविता भड व ग्रामसेवक सुभाष कुबडे यांच्या कार्यकाळात करण्यात आली.
***

Web Title: 12 ... khaparkheda ... road ... add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.