१२... खापरखेडा... रोड
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:05+5:302015-02-13T00:38:05+5:30
(फोटो)

१२... खापरखेडा... रोड
(फ ोटो)रस्त्यांच्या बांधकामात घोळचौकशी अहवालात उघड : दलित वस्ती सुधार योजना निधीचा गैरवापरअरुण महाजन ० खापरखेडाखापरखेडा नजीकच्या सिल्लेवाडा ग्रामपंचायतला जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधार योजनेचा ३० लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला होता. या निधीचा वापर दलित बांधवांच्या वस्त्यांमधील विकास कामांसाठी करावयाचा होता. वास्तवात तो निधी इतरत्र वापरण्यात आला. शिवाय, प्राकलनात मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांची मोजमापाची नोंद अधिक लांबीची दाखविण्यात आली. प्रत्यक्षात निर्मिती कमी लांबीची करण्यात आली. मोजमापाच्या नोंदीनुसार बिलांची उचलही करण्यात आली. हा प्रकार चौकशी अहवालात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. सिल्लेवाडा ग्रामपंचायतला २०१३-१४ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून दलित बांधवांच्या वस्त्यांमधील सिमेंट रस्त्यांची बांधकामे करावयाची होती. यात सिल्लेवाडा येथील वॉर्ड क्रमांक - १ मध्ये १४९.६३ मीटर रस्ता मंजूर करण्यात आला. मात्र, हा रस्ता १३५ मीटर लांबीचा तयार करण्यात आला असून, १९५ मीटर लांब रस्त्याचे मोजमाप नोंदविण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक - २ मध्ये १४९.६३ मीटर रस्ता मंजूर करण्यात आला असून, प्रत्यक्षात १४४.५० मीटर रस्त्याचे काम करण्यात आले. या वॉर्डात १९५ मीटर रस्त्याचे मोजमाप नोंदविले आहे. वॉर्ड - ३ मध्ये १४९.६३ माीटर रस्ता मंजूर केला. या ठिकाणी १८० मीटर रस्त्याचे मोजमाप नोंदविण्यात आले. प्रत्यक्षात १४५ मीटर रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आले. वॉर्ड क्रमांक - ४ मध्ये १४९.६३ मीटर लांबीच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली. काम मात्र १६५ मीटर रत्याचे करण्यात आले. मोजमाप करताना हा रस्ता १८९ मीटर नोंदविण्यात आला. वॉर्ड क्रमांक - ५ मध्ये १४९.६३ मीटर लांबीचा रस्ता मंजूर करण्यात आला असून, या रस्त्याचे मोजमाप १८५.६० मीटर दाखविण्यात आले. वास्तवात हा रस्ता १८० मीटर तयार करण्यात आला. या सर्व रस्त्यांची जाडी ही ०.१७ मीटर (अंदाजपत्रकानुसार) असायला हवी होती. ही जाडी ०.१५ मीटर एवढी ठेवण्यात आली. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मुरुम टाकणे आवश्यक असताना, काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला मुरुम टाकण्यात आला नाही, असेही प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले.