नेपाळमध्ये बस अपघातात १२ भारतीय भाविक ठार
By Admin | Updated: April 22, 2015 11:11 IST2015-04-22T10:52:53+5:302015-04-22T11:11:32+5:30
नेपाळची राजधानी काठमांडूहून गोरखपूर येथे जाणा-या बसला झालेल्या अपघातात १२ भारतीय भाविक ठार झाले आहेत.

नेपाळमध्ये बस अपघातात १२ भारतीय भाविक ठार
ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २२ - नेपाळची राजधानी काठमांडूहून गोरखपूर येथे जाणा-या बसला झालेल्या अपघातात १२ भारतीय भाविक ठार झाले असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी धादिंग जिल्ह्यातील नौंबाईस गावात ही बस खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुमारे ४५ भाविक पशुपतीनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते गोरखपूर येथे परत येत असतानाच बसला भीषण अपघात होऊन ती खोल दरीत कोसळली. त्यात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला. पोलिस व सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे, मात्र बस खोल दरीत अडकल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. जखमींवर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार काठमांडूहून निघताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.