शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी पाडणार कृषी भवन, विज्ञान भवनासह १२ महत्त्वाच्या वास्तू; विरोधकांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:54 IST

प्रकल्पाला २० हजार कोटी रुपये खर्च येणार, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामावर काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये नव्या संसद भवनासह आणखी काही इमारतींच्या बांधणीचा सुमारे २० हजार कोटी रुपये खर्चाचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प केंद्र सरकार धडाक्यात राबवत आहे. या प्रकल्पासाठी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स, शास्त्री भवन, कृषी भवन, विज्ञान भवन अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या बारा इमारती पाडण्यात येतील.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामावर काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी ४,५८,८२० चौरस मीटर क्षेत्रफळावर सध्या अस्तित्वात असलेली बांधकामे पाडण्यात येणार आहे. त्या जागी नवीन संसद भवन, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांच्यासाठी नवी निवासस्थाने तसेच सरकारी कार्यालयांसाठी दहा नव्या इमारती असे बांधकाम करण्यात येईल. 

नवे संसद भवन २०२२पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सध्या नॅशनल म्युझियमजवळ आहे. त्यांचे नवे घर नॉर्थ ब्लॉकमध्ये बांधले जाईल. पंतप्रधानांचे नवे निवासस्थान व कार्यालय हे साउथ ब्लॉकमध्ये बांधण्यात येणार आहे. सध्या केंद्रीय परराष्ट्र खात्याचे कार्यालय जवाहरलाल नेहरू भवनमध्ये आहे. त्यासाठी सात मजल्यांची इमारत बांधण्यात येईल. कृषी भवन, शास्त्री भवन या इमारती पाडून ती कार्यालये नव्या सचिवालयात हलविण्यात येतील. तसेच विज्ञान भवनाची इमारत पाडून तिथे नवीन कॉन्फरन्स हॉल बांधण्यात येईल.

या इमारती होणार जमीनदोस्तसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी पाडण्यात येणाऱ्या १२ इमारतींमध्ये इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस् या इमारतीचा समावेश आहे. या इमारतीचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत १९ नोव्हेंबर १९८५ रोजी उद् घाटन झाले होते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ बांधलेले शास्त्री भवन, कृषी भवन, विज्ञान भवन, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, नॅशनल म्युझियम, जवाहरलाल नेहरू भवन, निर्माण भवन, उद्योग भवन, रक्षा भवन, नॅशनल अर्काइव्हजची उपइमारत, लोककल्याण मार्ग आदी वास्तू पाडण्यात येणार आहेत. 

 

 

टॅग्स :delhiदिल्लीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी