अंदमान- निकोबारला भूकंपाचे १२ हादरे
By Admin | Updated: November 9, 2015 22:53 IST2015-11-09T22:48:06+5:302015-11-09T22:53:00+5:30
अंदमान- निकोबार बेटालगतच्या समुद्रात गेल्या २४ तासांत भूकंपाचे १२ हादरे बसले असून त्यांची तीव्रता ५ किंवा त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली असली तरी सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

अंदमान- निकोबारला भूकंपाचे १२ हादरे
नवी दिल्ली : अंदमान- निकोबार बेटालगतच्या समुद्रात गेल्या २४ तासांत भूकंपाचे १२ हादरे बसले असून त्यांची तीव्रता ५ किंवा त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली असली तरी सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
या भागात रविवारी भूकंपाचे नऊ हादरे जाणवले. इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रा बेटावर त्यांची तीव्रता मोजण्यात आली. अन्य हादरे अंदमान- निकोबारलगत जाणवले. सोमवारी ४.९, ५.१ आणि ४.९ रिश्टर स्केल क्षमतेचे तीन हादरे नोंदण्यात आल्याचे भूकंप विज्ञान विभागाने म्हटले आहे. या भूकंपाचे केंद्र १० ते ६० कि.मी. खोलवर आढळून आले. याच भागात २००४ साली आलेल्या सुनामीच्या लाटांनी भारत, इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंकेतील हजारो नागरिकांना कवेत घेतले होते.