१२ दंगलखोरांना अटक व दोन दिवसांची कोठडी
By Admin | Updated: February 22, 2016 19:28 IST2016-02-22T19:28:42+5:302016-02-22T19:28:42+5:30
जळगाव : शनिपेठ भागात रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील ३५ दंगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा अटकसत्र राबवून १२ संशयितांना अटक केली. त्यात एका गटाच्या सात तर दुसर्या गटाच्या पाच जणांचा समावेश आहे. त्यांना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

१२ दंगलखोरांना अटक व दोन दिवसांची कोठडी
ज गाव : शनिपेठ भागात रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील ३५ दंगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा अटकसत्र राबवून १२ संशयितांना अटक केली. त्यात एका गटाच्या सात तर दुसर्या गटाच्या पाच जणांचा समावेश आहे. त्यांना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलयाप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयकुमार दत्तात्रय सोनार यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी लखन भगवान सारवान (२७), अमित रुपसिंग धवलपुरे (१९), आकाश राजू मिलांदे (२१), योगेश महेश जोहरे (२३), किशोर गणपत गोहीत (४१), विशाल विनोद सोनवाल (२०) हेमंत मधुकर गोयल (२१) सर्व रा.शनिपेठ गुरुनानकनगर, जळगाव. तसेच दुसर्या गटातील सलीम खान अनिस खान (२०), आसिफ शहा बशीर शहा (३०), शेख जाकीर शेख रहीम (३०), शेख नासीर शेख रशीद (३९), अलफैज सैफुद्दीन शेख (१८),लल्ला सलीम, अय्याज खलील, बैरत दानीश, ताकर, शोएब, रिहान इक्बाल, जाकीर जहॉँगीर काकर, विक्की शरीफ काकर यांच्यासह इतर १४ ते १५ जण (सर्व रा.काट्याफाईल, शनिपेठ, जळगाव) यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३३२, ३३७, ३५३ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन क्रमांक १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.यांना झाली अटकपहिल्या गटातील लखन सारवान, अमित धवलपुरे, आकाश मिलांदे, योगेश जोहरे, किशोर गोहीत, विशाल सोनवाल, हेमंत गोयल यांना तर दुसर्या गटातील सलीम खान अनिस खान, आसिफ शहा बशीर शहा, शेख जाकीर शेख रहीम, शेख नासीर शेख रशीद, अलफैज सैफुद्दीन शेख यांना रविवारी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली.