१२... गुन्हे... जोड
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:27+5:302015-02-13T00:38:27+5:30
विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

१२... गुन्हे... जोड
व ष प्राशन करून तरुणाची आत्महत्याकुही : तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ससेगाव येथे सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मानसिंग भीमराव जाधव (२४, रा. ससेगाव, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. मानसिंगने त्याच्या राहत्या घरी विष प्राशन केले. सदर बाब लक्षात येताच घरच्या मंडळींनी त्याला लगेच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.***जळालेल्या महिलेचा मृत्यूकळमेश्वर : घरी स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राम्हणी येथे बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मीनाक्षी प्रमोद उईके (रा. ब्राम्हणी, ता. कळमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला नेहमीप्रमाणे घरी स्टोव्हवर स्वयंपाक करीत होती. दरम्यान, स्टोव्हचा भडका उडाला आणि तिच्या कपड्यांनी पेट घेतला. यात गंभीररीत्या जळाल्याने तिला नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.***महिलेची आत्महत्याकळमेश्वर : महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळमेश्वर शहरात बुधवारी रात्री घडली.शोभा धर्मदास ग्वालानी रा. ब्राम्हणी, ता. कळमेश्वर असे मृत महिलेचे नाव आहे. कळमेश्वर शहरातील नगर परिषदेच्या तलावात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सदर महिलेची ओळख पटली. ती बुधवारी रात्रीपासूून घरून निघून गेली होती, अशी माहिती जाणकारांनी दिली. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.***