१२... गुन्हे

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:28+5:302015-02-13T00:38:28+5:30

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लुटले

12 ... crime | १२... गुन्हे

१२... गुन्हे

व्हॉल्व्हरच्या धाकावर लुटले
टेंभरी शिवारातील घटना : ३ लाख १५ हजार रुपये पळविले
नागपूर : कार अडवून तीन अनोळखी तरुणांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर ३ लाख १५ हजार रुपये पळविल्याची घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभरी शिवारात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी मनोज बाबूलाल अंबुले (३४, बेलेकर ले-आऊट, हुडकेश्वर रोड नागपूर) हे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एमएच-३१/इके-३९३३ क्रमांकाच्या वाहनाने जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत चितरसिंह राठोड (५७, रा. राजस्थान) होते. शिवाय, त्यांनी बँकेतून काढलेली ३ लाख १५ हजार रुपये सोबत ठेवले होते. दरम्यान, ते टेंभरी शिवारात पोहोचले असता, एमएच-३१/इके-४५४८ क्रमांकाच्या मारुती व्हॅनने पाठलाग करीत असलेल्या तीन अनोळखी तरुणांनी त्यांचे वाहन अडविले. त्यातील एकाने त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला आणि त्यांच्याकडील रक्कम हिसकावून पळ काढला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३४१, ३९२, ३४ तथा आर्म ॲक्ट सहकलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहे.
***
ढालगाव खैरी शिवारात पाईपची चोरी
सावनेर : तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ढालगाव (खैरी) शिवारातून चोरट्यांनी ॲल्युमिनियमचे पाईप लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी श्रावण नीळकंठ खंडाईतकर (४०, ढालगाव खैरी, ता. सावने) यांची ढालगाव (खैरी) शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात ॲल्युमिनियमचे पाईप ठेवले होते. दरम्यान, चोरट्यांनी ते पाईप चोरून नेले. या पाईपची किंमत २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी केळवद पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
सिमेंटचे खांब तोडले
नागपूर : शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून सिमेंटचे खांब तोडल्याची घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसोला शिवारात सोमवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी विंदरसिंग तोहिंदर सिंगरवल (४५, रा. नागपूर) यांची आसोला शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि शेतातील २०० नग सिमेंटचे खांब तोडले. यात अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ४४७, ४२७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***

Web Title: 12 ... crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.