पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी १२ ते १५ वर्षाचे दहशतवादी भारतात दाखल
By Admin | Updated: January 24, 2016 11:34 IST2016-01-24T09:11:33+5:302016-01-24T11:34:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी इसिच्या निशाण्यावर असून २६ जानेनारीला प्रजासत्ताक दिनी मोदींवर हल्ला करण्याची योजना इसिस आखत असल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी १२ ते १५ वर्षाचे दहशतवादी भारतात दाखल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी इसिच्या निशाण्यावर असून २६ जानेनारीला प्रजासत्ताक दिनी मोदींवर हल्ला करण्याची योजना इसिस आखत असल्याचे वृत्त सुरक्षा यंत्रणांनी दिले आहे. आणि त्यासाठी १२ ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुलांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी सुरक्षा रक्षकांना न सांगताच अचानक लाल किल्ल्यावर लहान मुलांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचाच फायदा इसिसकडून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीवरुन पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात येणार आहे. १२ ते १५ वर्षाची मुले स्फोटके आणि हत्यारांसह भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अलर्टनंतर मोदींच्या सुरक्षेतील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप पूर्णपणे सतर्क झाला आहे. या हल्ल्यासाठी इसिससमवेत इतरही दहशतवादी संघटना लहान मुलांना तयार करत आहे.
काही दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटनांनी लहान मुलांना प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडिओमध्ये लहान मुलांना शारिरीक प्रशिक्षणासह मशीनगन आणि रॉकेट लाँचींग करताना दाखवण्यात आले होते.
अफगाणिस्तान-पाकिस्तानातील उत्तम दहशतवादी कँपमध्ये या लहान मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.