गेल्या आठ महिन्यात पोलीस कोठडीत १११ कैद्यांचा मृत्यू
By Admin | Updated: December 8, 2015 18:09 IST2015-12-08T18:09:30+5:302015-12-08T18:09:30+5:30
गेल्या आठ महिन्यात देशभरात १११ कैद्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत दिली.

गेल्या आठ महिन्यात पोलीस कोठडीत १११ कैद्यांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - गेल्या आठ महिन्यात देशभरात १११ कैद्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत दिली.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठ महिन्यात देशभरात १११ जणांचा मृत्यू पोलीस कोठडीत असताना झाला. त्याचबरोबर जवळजवळ ३३० केसेस अशा आहेत की, यामध्ये कैद्यांना पोलीस कोठडीतच पोलीसांकडून त्रास झाल्याच्या आहेत. तसेच १ एप्रिलपासून ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान देशात २४,९१६ अॅक्ट्रोसिटी गुन्हांची नोंद पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत दिली.