रेल्वे अर्थसंकल्पातील ११० आश्वासने पूर्ण - सुरेश प्रभू
By Admin | Updated: January 8, 2016 18:16 IST2016-01-08T18:13:38+5:302016-01-08T18:16:22+5:30
रेल्वे प्रवाशांच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या आश्वासनांपैकी जवळजवळ ११० अर्थसंकल्पातील कामे पूर्णपणे करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

रेल्वे अर्थसंकल्पातील ११० आश्वासने पूर्ण - सुरेश प्रभू
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ८ - रेल्वे प्रवाशांच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या आश्वासनांपैकी जवळजवळ ११० अर्थसंकल्पातील कामे पूर्णपणे करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दिली.
कोलकाता येथील हावडा स्टेशनवर काही नव्या गाड्यांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा कंदील दाखविला. यावेळी ते बोलत होते.
उशिर झालेल्या ईस्ट-वेस्ट मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम येत्या दोन-अडीज वर्षात पुर्ण करण्यात येईल. आम्ही अनेक उपक्रमांवर काम करत असून प्रवाशांना चांगली सेवा देण्याचाच हा एक भाग आहे. आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच, रेल्वे अर्थसंकल्पात देण्यात येणा-या वचनबद्धतेपैकी जवळजवळ ११० वचने आमच्या कडून पूर्ण करण्यात आल्याचा मला आनंद होत असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. याचबरोबर आयआरसीटीसी संकेतस्थळाच्या माध्यमातून एकाच ठिकाणाहून ऑनलाइन बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून यामध्ये आणखी सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, रेल्वे आणि स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. जुन्या डब्यांच्या जागी नविन डबे आणण्याचे काम सुरु असल्याचेही यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.