शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आसाम निवडणुकीच्या काळात 110 कोटींचे साहित्य केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 06:06 IST

आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले.

गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले. राज्याच्या आजवरच्या निवडणुकीच्या काळातील ही सर्वाधिक जप्ती आहे, असेही ते म्हणाले. राज्यात २०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्राच्या तसेच राज्याच्या विविध संस्थांनी २० कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले होते. यावेळी २६ फेब्रुवारी रोजी आसाम विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत ११०.८३ कोटी रुपयांची रोख रक्कम व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३४.२९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३३.२९ कोटी किमतीची १६.६१ लाख लीटर दूर, २४.५० कोटी रुपयांची रोख रक्कम व ३.६८ कोटी रुपयांचे सोने-चांदी जप्त करण्यात आले.आसाम पोलीस, फिरती पथके, अबकारी विभागासह अन्य संस्थांनी या सर्व वस्तू आसामच्या विविध जिल्ह्यांतून जप्त केल्या आहेत. भेटवस्तू, विदेशी बनावटीच्या सिगारेट, पान मसाला, सुपारी यासह अन्य  अनेक वस्तूही जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत १४.९१ कोटी रुपये आहे.राज्यात निवडणूक खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यासंबंधीचे ५० गुन्हे नोंदले गेले आहेत. तर अबकारी नियमांच्या उल्लंघनाबाबत ५,२३४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तथापि, या संबंधात किती लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, याची त्यांनी माहिती दिली नाही. आचारसंहिता भंगची २,६९६ प्रकरणेआदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची आसाममध्ये एकूण २,६९६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यात १,२७२ प्रकरणे ऑनलाइन ई-व्हिजील ॲपच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहेत. यातील ९०८ प्रकरणे योग्य ठरली आहेत.- अर्पणा माधव, गुवाहाटी

टॅग्स :AssamआसामAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१