नसबंदी शस्त्रक्रियेनंतर 11 महिलांचा मृत्यू
By Admin | Updated: November 12, 2014 02:44 IST2014-11-12T02:44:48+5:302014-11-12T02:44:48+5:30
कुटुंब नियोजन शिबिरात नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतर 11 महिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह़े

नसबंदी शस्त्रक्रियेनंतर 11 महिलांचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये वैैद्यकीय निष्काळजीपणाचा कहर : चार वैद्यकीय अधिकारी तडकाफडकी निलंबित; घटनेच्या चौकशीचे आदेश
बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात राज्यसरकारतर्फे आयोजित कुटुंब नियोजन शिबिरात नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतर 11 महिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह़े अद्यापही 49 महिलांची प्रकृती गंभीर आह़े या घटनेनंतर सरकारने चार वैद्यकीय अधिका:यांना हलगर्जीपणा केल्याबद्दल तडकाफडकी निलंबित केले असून शस्त्रक्रिया करणा:या मुख्य शल्यविशारदाविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत़ प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत़
बिलासपूर जिल्ह्यातील सकरी (पेन्डारी) गावातील नेमीचंद जैन कॅन्सर रिसर्च सेंटर या खासगी रुग्णालयात गत शनिवारी शासकीय कुटुंब कल्याण आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होत़े
या शिबिरात तखतपूर ब्लॉक आणि बिलासपूरच्या आजूबाजूच्या खेडय़ातील 83 महिलांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली़ शस्त्रक्रियेनंतर सर्वाना रात्री उशिरा औषधोपचार करून सुटी देण्यात आली़ मात्र यानंतर 24 तासांतच यापैकी बहुतांश महिलांना डोकेदुखी, उलटय़ा आणि तीव्र पोटदुखीचा त्रस होऊ लागला़ या त्रसानंतर 6क् महिलांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होत़े त्यापैकी अकरा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मृत महिला 32 पेक्षा कमी वयोगटातील आहेत़
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ़ क़ेसी़ ओराम़ बिलासपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ़ एस़सी़ भांग, तखतपूरचे विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रमोद तिवारी आणि एक शासकीय सजर्न डॉ़ आऱक़े गुप्ता यांचा समावेश आह़े
गुप्ता यांनीच महिलांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे कळत़े या घटनेनंतर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री रमण सिंह तसेच आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली़ (वृत्तसंस्था)
4छत्तीसगड सरकारने प्रारंभी मृत महिलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली होती़ मात्र नंतर मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम चार लाख रुपयांर्पयत वाढवली़ प्रकृति गंभीर बनलेल्या महिलांना प्रत्येकी 5क् हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली व त्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे सांगितल़े
हाइपोवॉलूमिक शॉक किंवा सेप्टिकमुळे मृत्यू?
4नसबंदी शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झालेल्या 11 महिलांपैकी एकीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आह़े यात मृत्यूचे कारण कथितरीत्या हायपोवॉलूमिक शॉक वा सेप्टिक असल्याचे कळत़े
4प्राथमिक तपासाअंती शस्त्रक्रियेदरम्यानच्या हलगर्जीपणामुळे 11 महिलांना जीव गमवावा लागला आह़े या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून यासाठी एका त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आह़े, असे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी सांगितले.
4नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यानचा हलगर्जीपणा आणि त्यामुळे 11 महिलांचा मृत्यू या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड सरकारला दिले आह़े या घटनेवर त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केल़े