शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये बसची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक, 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 21:55 IST

सिकर येथील राष्ट्रीय महामार्गावर बसची धडक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पाचच्या सुमारास घडली. तर या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. 

ठळक मुद्देबसची धडक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसल्याने 11 जणांचा मृत्यू 12 जण जखमी, जखमींपैकी 5 जण गंभीर मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत

जयपूर : सिकर येथील राष्ट्रीय महामार्गावर बसची धडक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पाचच्या सुमारास घडली. तर या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. सिकर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 11 वर रोलसाहबसर आणि फतेहपूरच्या दरम्यान एका  बसला ओव्हरटेक करणाचा प्रयत्न करणा-या बसची धडक रस्त्याच्या बाजूने जाणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसली. या अपघातात बसच्या चालका आणि वाहकासह 11 प्रवाशांचा जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या प्रवाशांना सिकर आणि जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 5 जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भयंकर होता की, बसची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसल्यानंतर बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी पाचच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिकरचे जिल्हाधिकारी नरेश कुमार आणि पोलीस अधिकारी विनित कुमार यांच्यासह स्थानिक लोकांनी मदतकार्य सुरु केले. तसेच, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  राज्यस्थानमध्ये अपघाताची ही दुसरी घटना आहे. याआधी जयपूरमधील रेनवाल येथे टेम्पो आणि ट्रकचा यांच्यात अपघात झाला. या अपघात आठ जणांचा मृत्यू झाला असून सहा जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. 

टॅग्स :Accidentअपघात