गडहिंग्लजमध्ये जुगार खेळणार्‍या ११ जणांना अटक

By Admin | Updated: May 6, 2014 22:40 IST2014-05-06T22:40:42+5:302014-05-06T22:40:42+5:30

२७ हजारांचा मुद्देमाल जप्त

11 people arrested in gudhangladesh arrested in gambling | गडहिंग्लजमध्ये जुगार खेळणार्‍या ११ जणांना अटक

गडहिंग्लजमध्ये जुगार खेळणार्‍या ११ जणांना अटक

हजारांचा मुद्देमाल जप्त

गडहिंग्लज : तीन पाणी जुगार खेळताना सापडलेल्या ११ जणांना पोलिसांनी अटक केली. जुगार साहित्यासह रोकड मिळून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहरातील कुंभार गल्लीत दुपारी ४ वाजता छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शहरातील कुंभार गल्लीतील दत्ता कुंभार यांच्या शेडनजीकच्या सार्वजनिक जागेत उघड्यावर तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला.
यावेळी सद्दाम रमजान किल्लेदार (वय २४), विनायक सत्याप्पा भम्मानगोळ (२५), आण्णासाहेब सुरेश नाईक (२३), कृपणासिंगे प्रकाशसिंग हजारे (२१), विष्णू मारुती परीट (३१), गजानन नारायण कुंभार (४०), विनायक तुकाराम क्षीरसागर (३०), किरण जोतिबा कुंभार (३९), विष्णू नाना कुंभार (५३), राजेंद्र महादेव कुंभार (३०) व नितीन आणाप्पा बामणे (२२) रा. सर्वजण गडहिंग्लज) या सर्वांना पोलिसांनी अटक केली.
पोलीस नाईक अशोक शेळके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्‘ाची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ अधिक तपास करीत आहेत.
प्रतिनिधी.

Web Title: 11 people arrested in gudhangladesh arrested in gambling