ममता बॅनर्जींचा शिरच्छेद करणा-याला भाजपा नेत्याकडून 11 लाखांचं बक्षीस जाहीर
By Admin | Updated: April 12, 2017 10:53 IST2017-04-12T10:53:42+5:302017-04-12T10:53:42+5:30
भाजपाचे जनता युवा मोर्चाचे नेते योगेश वार्ष्णेय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणा-या व्यक्तीला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली

ममता बॅनर्जींचा शिरच्छेद करणा-याला भाजपा नेत्याकडून 11 लाखांचं बक्षीस जाहीर
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 12 - भाजपाचे जनता युवा मोर्चाचे नेते योगेश वार्ष्णेय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणा-या व्यक्तीला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेला मुलाखतीत योगेश म्हणाला, पश्चिम बंगालमधल्या सुरी आणि वीरभूम जिल्ह्यात हनुमान जयंतीच्या प्रसंगी जय श्रीरामची घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज करण्यात आला होता. लोकांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि हे सर्व दुर्भाग्यपूर्ण आहे. लाठीचार्ज करण्यात आलेली माणसं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हती तर ती साधी श्रद्धाळू माणसे होती.
वार्ष्णेयनं ममता सरकारवर मुस्लिमांच्या ध्रुवीकरणासाठी हिंदूंना लक्ष्य करत असल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळेच नैराश्यातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणा-याला मी 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. वीरभूममध्ये सुरी पोलिसांनी हनुमान जयंतीच्या आयोजकांना कोणत्याही प्रकारची रॅली काढण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र तरीही एक मिरवणूक काढण्यात आली आणि त्यात जवळपास 5 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. त्यात काही बाइकस्वार हातात भगवा झेंडा घेऊन होते. तसेच जय श्रीरामची घोषणाबाजीही करण्यात आली होती. मात्र या मिरवणुकीत भाजपा किंवा आरएसएसचा कोणताही नेता सहभागी झाला नव्हता.
#WATCH Aligarh:BJP Youth wing leader Yogesh Varshney offers Rs 11 lakhs for WB CM"s head after a lathicharge in Birbhum on Hanuman Jayanti pic.twitter.com/JR77MgzptV
— ANI UP (@ANINewsUP) April 12, 2017