वाहन खरेदीत सूट मिळवून देण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:51+5:302015-08-08T00:23:51+5:30
नाशिक : दोन नवीन बोलेरो वाहनाच्या खरेदीत प्रत्येकी एक लाख रुपयांची सूट मिळवून देतो या नावाखाली पुणे येथील संशयिताने दोघांची सुमारे साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

वाहन खरेदीत सूट मिळवून देण्याच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक
न शिक : दोन नवीन बोलेरो वाहनाच्या खरेदीत प्रत्येकी एक लाख रुपयांची सूट मिळवून देतो या नावाखाली पुणे येथील संशयिताने दोघांची सुमारे साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अंबड येथील जितेंद्र मोटर्समधील कर्मचार्यांचा विश्वास संपादन करणारा संशयित दीपक बाळासाहेब वटवळे (३०, रा़ निफाड) हा सेल्स एक्झिक्युटिव्ह असल्याचे सांगत असे़ या शोरूममध्ये बोलेरो खरेदीसाठी आलेले गणेश अरविंद दिवटे (रा़पुणे) व विजय चंद्रभान अहेर (रा़औरंगाबाद) या दोन ग्राहकांना वटवळे याने प्रत्येकी एक लाख रुपयांची सूट मिळवून देतो असे खोटे सांगितले़या दोघांकडून पाच व साडेसहा असे साडेअकरा लाख रुपये घेऊन ते जितेंद्र मोटर्सच्या खात्यात भरतो असे सांगितले़; मात्र ज्या ग्राहकांनी पैसे दिले त्यांना बोलेरो वाहन मिळालेच नसल्याचे शोरूमचे अनिल वनरावन पालन यांच्या लक्षात आले़ त्यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाणे गाठून संशयित वटवळे विरोधात फिर्याद दिली आहे़(प्रतिनिधी)